महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्यांपुढे वनविभागही हतबल - CHANDRAPUR NEWS

राजुरा वन परिक्षेत्रात वाघाची संख्या वाढली आहे. वाघांचे होणारे हल्ले बघता जोगापूर देवस्थान यात्रा बंद करण्यात आली. आता गटागटाने वनकर्मचारी रात्रंदिवस गस्त करत आहेत. मात्र, वाघ पाळिव जनावरांना आपले भक्ष्य करत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चंद्रपुर
वनविभाग चंद्रपूर

By

Published : Dec 21, 2019, 10:49 AM IST

चंद्रपूर- मागील महिन्याभरापासून राजुरा वनक्षेत्रात वाघाची दहशत सूरू आहे. वाघ-मानव संघर्षाने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी गटागटाने रात्रंदिवस गस्त करत आहेत. परंतु, वाघ हुलकावणी देत असल्याने वन कर्मचारी सुद्धा हतबल झाले आहेत. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात पाळिव जनावरे ठार होण्याचे सत्र सूरुच आहे.

प्रतिक्रिया देताना वनरक्षक आनंदराव कारेकर

राजुरा वन परिक्षेत्रात वाघाची संख्या वाढली आहे. मूर्ती गावातील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले होते. तर चिंचबोळी येथील दोघांना वाघाने जखमी केल्याची घटना घडली. वाघांचे होणारे हल्ले बघता जोगापूर देवस्थान यात्रा बंद करण्यात आली. आता गटागटाने वनकर्मचारी रात्रंदिवस गस्त करीत आहेत. मात्र, वाघ पाळीव जनावरांना आपले भक्ष्य करत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाघाच्या दहशतीमुळे शेतातील कामे करणे शेतकऱ्यांनी बंद केले आहेत. परिणामी वन्यप्राणी शेतपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहेत. दरम्यान, वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details