महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ताडोबातील बिथरलेल्या हत्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडले; एकाचा मृत्यू एक गंभीर

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात धक्कादायक घटना घडली आली आहे. बिथरलेल्या 'गजराज' नामक हत्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडले आहे.

elephant_killed_one
elephant_killed_one

By

Published : May 7, 2021, 12:06 AM IST

चंद्रपूर -चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात धक्कादायक घटना घडली आली आहे. बिथरलेल्या 'गजराज' नामक हत्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडले आहे. बोटेझरी या भागात एका वाहनातून कोळसा वनक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक कुलकर्णी आणि ताडोबाचे मुख्य लेखापाल असे दोघे गस्तीवर होते. एका वळणावर बिथरलेल्या हत्ती 'गजराज' ने चाल करून येत दोघांवर थेट हल्ला केला.

हत्ती आज सकाळी अनियंत्रित झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांना नव्हती. हल्ल्यात प्रमोद गौरकार नामक मुख्य लेखापाल यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले. ताडोबा कोअर क्षेत्रात बोटेझरी येथील हत्ती कॅम्पलगत झालेल्या या घटनेने वनविभाग हादरला आहे. आसपासच्या गावातील नागरिकांना बिथरलेल्या हत्तीबाबत सूचना देण्यात आली आहे. या घटनेनंतर हत्तीला काबूत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

वन्यजीव चिकित्सक ताडोबाच्या कोअर भागात बेशुद्ध करण्याच्या साधनांसह पोचले असून हत्ती अद्याप सापडलेला नाही. याआधी गजराजने आपल्याच जानकीराम मसराम या माहुताला नोव्हेंबर 2019 मध्ये चिरडले होते. तर यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघीण प्रकरणाच्या सुमारास या हत्तीने कॅम्प सोडून पळ काढत गोंधळ घातला होता. ताडोबाचे लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या मृत्यूने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कर्मचारीवर्गावर शोककळा पसरली आहे. वरिष्ठ वनाधिकारी ताडोबाकडे रवाना झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details