महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून वनरक्षकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

वनरक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळ कर्मचारी संघटना सदस्यांनी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत रामबाग येथील व्यवस्थापक कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले आहे.

वनरक्षकाची आत्महत्या

By

Published : Nov 9, 2019, 7:29 PM IST

चंद्रपूर- वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे वनरक्षकाने गळफास लावून आपले जीवन संपवल्याची घटना आज चंद्रपूरमध्ये घडली. गणेश झोंबडे, असे वनरक्षकाचे नाव असून त्याला निलंबित करण्यात आले होते. मात्र, या दरम्यान त्याला मानसिक त्रास दिला जात होता. म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.

चंद्रपुरात वनरक्षकाची आत्महत्या

हेही वाचा -नागभीड येथील स्मशानभूमी बनली कचरा डम्पींग यार्ड

गणेश झोंबडे हा वनविकास महामंडळ जुनोना येथे कर्तव्यावर होता. एका अनियमिततेच्या प्रकरणात तो गेल्या 17 महिन्यांपासून निलंबित होता. दरम्यान, आज गणेशने आत्महत्या केली. गणेशच्या मृतदेहाजवळ एक चिट्टीही सापडली आहे.

हेही वाचा - चंद्रपुरात मुलाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय पोलीस ठाण्यात धडकले

वनरक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळ कर्मचारी संघटना सदस्यांनी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत रामबाग येथील व्यवस्थापक कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले आहे. वनरक्षकाचा मृतदेह रामबाग येथील वनविकास महामंडळ कार्यालयापुढे ठेवला असून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details