महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शौचालयाच्या खड्ड्यात पडले चितळाचे पिल्लू; अथक परिश्रमातून वनविभागाने दिले जीवदान - चंद्रपुरात शौचालयाचा खड्ड्यात पडले चितळ

जंगलातील वन्यजीव शहरात अधूनमधून शिरकाव करतात. गोंडपीपरी शहराला लागून दाट जंगल आहे. या जंगलातील चितळाचे पिल्लू शहरात घुसून शौचालयाच्या खड्ड्यात पडले.

chandrapur
शौचालयाचा खड्ड्यात पडलेले पिल्लू

By

Published : Jun 20, 2020, 5:14 PM IST

चंद्रपूर- जंगलातून भटकलेला चितळाच्या पिल्लामागे कुत्रे लागल्याने ते सैरभैर करत शौचालयाच्या खड्ड्यात पडले. ही घटना गोंडपिंपरी येथील पंचशिल बुद्धविहाराजवळ घडली. अखेर शौचालयाच्या खड्ड्यात पडलेल्या या पिल्लाला तब्बल दोन तासानंतर बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर या पिल्लाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून दिले.

गोंडपीपरी शहराला लागून दाट जंगल आहे. जंगलातील वन्यजीव शहरात अधूनमधून शिरकाव करतात. शनिवारी सहा वाजता भटकलेल्या चितळाचे पिल्लू शहरात आले. शहरातील मोकाट कुत्रे मागे लागल्याने ते सैरभैर पळत सूटले. त्यानंतर पंचशील बुद्ध विहारालगत असलेल्या शौचालयाचा खड्यात ते पडला. खड्ड्याबाहेर निघण्यासाठी त्याची धडपड सूरु होती. घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाच्या धाबाचे पतक घटनास्थळी पोहोचले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर पिल्लाला खड्ड्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details