महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खबरदार! वनक्षेत्रात जनावरे न्याल तर.. ; वनविभागाची गुराख्यांना तंबी - forest department of gadchiroli bannned villagers

याबाबत जंगलात गुरांना चराईसाठी नेण्यास वनविभागाने बंदी घातली आहे. गुराख्यांनी गुराढोरांना चराईसाठी रोपवन वगळता इतरत्र नेण्याच्या सूचना केल्या आहेत, असे वनरक्षक धनराज रायपुरे यांनी सांगितले.

निवेदन देताना गावकरी

By

Published : Sep 4, 2019, 8:02 PM IST

चंद्रपूर- वनक्षेत्रात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्याला जनावरे येथे परत दिसता कामा नये, अशी तंबी वनरक्षकाने दिली. गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे हा प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी भरपावसात वनकार्यालय गाठले. कार्यालयात लिपिक वगळता कुणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे भ्रमणध्वनीव्दारे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी आपली समस्या मांडली.

या प्रकरणी माहिती देताना गावकरी

जंगलात गुरांना चराईसाठी नेण्यास वनविभागाने बंदी घातली आहे. गुराख्यांनी गुराढोरांना चराईसाठी रोपवन वगळता इतरत्र नेण्यात यावे, अशी त्यांना सूचना दिल्याचे, वनरक्षक धनराज रायपुरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पोडसा नदीच्या काठाला लागून एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय वनविभागाला आहे. यात अनेक शेतकऱ्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हापासून वनविभाग आणि शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता वनविभागाने गुरांना चराई क्षेत्रात जाण्यासाठी बंदी लावली आहे.

दरम्यान, गावकऱ्यांजवळ चराई पर्वाना असताना देखील त्यांना वन विभागाकडून अडविले जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे. वन विभागाने आम्हाला गुरे चरविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details