चंद्रपूर - तालुक्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात कोंबडबाजाराचे काही लोक आयोजन करत होते. व लाखोचा सट्टा चालत होता. यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यात पाच आरोपींना अटक करण्यात आला असून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खैरगाव परिसरात कोंबडबाजार भरवला जात असल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. कोंबड्याची लढाई करणे, त्यावर जुगार खेळणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून हा जुगार खेळला जात होता. यावर मंगळवारी (दि.13 ऑक्टोबर) कारवाई करण्यात आली. यात घटनास्थळावरुन पाच आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये तुळसीदास जनार्धन ताजने, नागेश सुखदेव चिंचुलकर, संदीप शालीकराम ढुमने, अरविंद मारोती कातकर, भाग्यवान मारोती डाखरे यांचा समावेश आहे. तसेच पाच दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 900 रुपये रोख, 4 नग कोबंडे (पैकी 2 मरण पावलेले), लोखंडी कात्या, 3 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सुनिल गौरकार, प्रविण सोनोने, अशोक मंजुळकर, ऊमेश वाघमारे, मनोहर जाधव, संतोष आडे, मंगेश शेंडे यांनी कारवाई केली.
कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या पाच जणांना अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - चंद्रपूर गुन्हे बातमी
चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी वाहने 2 हजार 900 रुपये रोख व इतर साहित्य, असा एकुण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी व पोलीस