महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aaditya Thackeray Chandrapur Tour : चंद्रपुरातील मच्छिमारांना आदित्य ठाकरेंना भेटण्याची इच्छा.. भेटीसाठी वेळ देण्याची मागणी - चंद्रपुरातील मच्छिमारांना आदित्य ठाकरेंना भेटण्याची इच्छा

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ( Aaditya Thackeray Chandrapur Tour ) आहेत. मात्र येथील मच्छिमारांना त्यांना भेटण्यास वेळ देण्यात आलेला नाही. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना भेटण्याची वेळ आम्हाला द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली ( Fisherman Demands To Meet Aaditya Thackeray ) आहे.

चंद्रपुरातील मच्छिमारांना आदित्य ठाकरेंना भेटण्याची इच्छा
चंद्रपुरातील मच्छिमारांना आदित्य ठाकरेंना भेटण्याची इच्छा

By

Published : Feb 13, 2022, 3:43 PM IST

चंद्रपूर : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज रामाळा तलावाच्या कामाची पाहणी करण्यासाठी चंद्रपुरात येणार ( Aaditya Thackeray Chandrapur Tour ) आहेत. मात्र, त्यांच्या या भेटीत वाल्मिकी मच्छीमार संघटनेचा उल्लेख नाही आहे. यावर या संघटनेने आक्षेप घेतला असून, आम्हाला भेट घेण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली ( Fisherman Demands To Meet Aaditya Thackeray ) आहे. गेल्या 67 वर्षांपासून ह्या संघटनेच्या माध्यमातून रामाळा तलावाचे संवर्धन करण्याचे कार्य करत असताना जिल्हा प्रशासनाने आम्हाला डावलले असा आरोप त्यांनी केला आहे.

चंद्रपुरातील मच्छिमारांना आदित्य ठाकरेंना भेटण्याची इच्छा.. भेटीसाठी वेळ देण्याची मागणी

१९५७ पासून चालतो उदरनिर्वाह

संघटनेच्या म्हणण्यानुसार, वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेची स्थापना १४ नोव्हेंबर १९५७ ला करण्यात आली. १९५७ पासून या संस्थेला महाराष्ट्र शासनाने रामाळा तलावात मासेमारी करण्याचा अधिकार दिलेला असून, त्याला अतिक्रमण्यापासून वाचविणे, साफसफाई करणे तसेच देवी व गणपतीचे सांगाडे गेल्या ६५ वर्षापासून संस्थेचे सभासद शासनाची कोणतीही मदत न घेता करत आहेत. आजपर्यंत रामाळा तलावाचा विकास असो किंवा इतर समस्या असेल किंवा इतर कोणत्याही घटना घडल्यास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन यांनी कधीही वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेला गृहीत धरल्याशिवाय काम केले नाही. गणपती विर्सजन, देवी विर्सजन कोणी आत्महत्या केल्यास प्रेत काढणे, मेलेल्या जनावराचे शव काढणे, एकोर्निया सारखी घातक वनस्पती वाढू न देणे, निर्माल्य काढून फेकने अश्या अनेक पर्यावरणाला घातक प्रक्रिये पासून तलावाला वाचविण्यासाठी संस्थेचे सभासद गेल्या ६५ वर्षापासून कार्य करित आहे. सध्या संस्थेचे सभासद हे ३०० च्या जवळपास असून त्यांच्या सर्व कुंटूंबाचा उदरनिर्वाह हा रामाळा तलावाच्या मासेमारीवर अवलंबून आहे.

समस्या मांडणार

कोरोना काळापासून तलावाचे खोली करण्यासाठी पाणी सोडल्याने सभासदाच्या कुंटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेचे सभासद दिवस रात्र रामाळा तलावाला वाचविण्यासाठी अथक परिश्रम करित आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे रामाळा तलावाला भेट देत असताना जिल्हा प्रशासनाने या संस्थेला साधे पत्र देखील देऊन कळवले नाही. भविष्यात येथील मच्छीमार बांधवावर प्रशासनाचे दुर्लक्ष होऊन त्याच्यावर उपासमारीची पाळी येण्याचे शक्यता आहे. म्हणून आपल्या माध्यमातून जो मच्छीमार बांधव नैसर्गिक रित्या पाण्याचे नियोजन करून तलावाचे संगोपन करित आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी रामाळा तलाव वाचवणाऱ्या समाज बांधवांना भेट देवून त्याची समस्या जानून दिलासा द्यावा अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details