चंद्रपूर - गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोनामुक्त असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शानिवारी सायंकाळी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे, जिल्ह्यातील बंगाली कॅम्प परिसरात असणारा कृष्णानगर भाग पूर्णतः सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूरात आढळला पहिला कोरोना रुग्ण, बंगाली कॅम्प परिसरातील कृष्णानगर सील
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शानिवारी सायंकाळी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे, जिल्ह्यातील बंगाली कॅम्प परिसरात असणारा कृष्णानगर भाग पूर्णतः सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर विभागातील नागपूर आणि भंडारा पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. विभागात वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही. चंद्रपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला.
परिसरात आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. आजपासून महानगर परिसरात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.