चंद्रपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने कुठल्याही प्रकारची नोटीस बजावलीच नव्हती. त्यामुळे ईडीच्या कार्यालयात जाण्याचा प्रश्नच नव्हता, असा खुलासा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया हेही वाचा -LIVE: अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; कारण गुलदस्त्यात
आज पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून त्यांनी जाण्याचे टाळले. यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी या मुद्यावर राजकारण न करता सहकार्य करण्याची भूमिका ही स्वागतार्ह असून आपण एक नागरिक म्हणून त्यांच स्वागत करतो, असे मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा - ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे