चंद्रपूर -चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील वार्ड क्रमांक ५ मधील सार्वजनिक विहिरीमध्ये रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान तीन वर्षीय मुलगी खेळताना पडली. तिला वाचविण्याकरिता वडिलांनीही विहिरीत उडी मारली. मात्र, त्यांनाही पोहता येत नसल्याने दोघेही गटांगळ्या खायला लागले. यावेळेस गस्तीवर असलेले पोलीस शिपाई नागरगोजे यांनी विहिरीत उडी मारून दोघांचेही प्राण वाचवून खरे हिरो ठरले.
पोलीस शिपाई ठरला खरा हिरो..! विहिरीत उडी मारून वाचवले बापलेकीचे प्राण
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील वार्ड क्रमांक ५ मधील सार्वजनीक विहिरीमध्ये रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान तीन वर्षीय मुलगी खेळताना पडली. तिला वाचविण्याकरिता वडीलांनीही विहिरीत उडी मारली.
शंकरपूर पोलीस चौकीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जांभळे आपल्या कर्मचाऱ्यांसह गावात गस्तीवर असताना, त्यांना वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सार्वजनिक विहिरीवर गर्दी आणी आरडा ओरड होताना दिसली. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन चौकशी केली असता प्रभाकर बारेकर यांची तीन वर्षीय मुलगी खेळत असताना विहिरीत पडली. तिला वाचविण्याकरिता प्रभाकर यांनीही उडी मारली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने दोघेही गटागंळ्या खात असल्याचे माहिती झाली.
पोलीस पथकात असलेले शिपाई परमेश्वर नागरगोजे यांनी क्षणाचाही विचार न करता आला मोबाईल व पॉकेट सहकाऱ्यांकडे देऊन ४० फूट खोल व १५ फूट पाणी असलेल्या विहिरीत उडी मारली आणि बाप लेकींना गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. दोघांनाही शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचीही प्रकृती सुधारली आहे.