चंद्रपूर - राजुरा शहरातील एका अल्पवयीन मुलावर त्याच्या वडिलाने आणि एका व्यापाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी वडील आणि व्यापाऱयाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाची आई, बहीण बाहेर गावी गेले होते. जेवण आटोपल्यावर पीडित मुलगा झोपी गेला. रात्रीच्या बारा वाजता वडिलांनी मुलाशी बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर सलग दोन दिवस वडिलाने त्याच्यावर अत्याचार केला. कुणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकीही वडिलाने त्याला दिली.
दरम्यान, शाळेतून घरी जाणाऱया रस्तावरील दुकान असलेल्या व्यापाऱयानेही पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. 25 फेब्रुवारीला पीडित मुलगा ट्युशन क्लास आटोपून घरी निघाला होता. त्या व्यापाऱयाने मुलाला बोलावले. त्यानंतर आपल्या गोडाऊनमध्ये नेत त्यावर अत्याचार केल्याचा पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.