चंद्रपूर- कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज जोडणीसाठी डिमांड भरले आहे. मात्र, अद्यापही कृषीपंपांची वीज जोडणी झालेली नाही. त्यामुळे, संतापलेल्या शेतकऱ्यांनी भा.ज.यु.मो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात आज मंगळवारी विद्युत वितरण कंपनीवर धडक दिली व उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले.
डिमांड भरूनही वीजजोडणी नाही; शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर दिली धडक
कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज जोडणीसाठी डिमांड भरले आहेत. परंतु, अद्यापही विद्युत जोडणी झालेली नाही. त्यामुळे, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती सिंचनापासून वंचित आहे. तर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये सदोष मीटर असल्यामुळे नागरिकांना वाढीव वीज देयके येत आहेत. त्यामुळे, या समस्यांपासून पीडित शेतकऱ्यांनी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली व उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले.
कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज जोडणीसाठी डिमांड भरले आहेत. परंतु, अद्यापही विद्युत जोडणी झालेली नाही. त्यामुळे, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती सिंचनापासून वंचित आहे. तर, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये सदोश मीटर असल्यामुळे नागरिकांना वाढीव वीज देयके येत आहेत. त्यामुळे, या समस्यांपासून पीडित शेतकऱ्यांनी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली व उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा-यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा