चंद्रपूर - उच्च दर्जाच्या तांदळाच्या बियाणाची लागवड केलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. या बियाणापासून निघालेल्या तांदळाला बाजारात कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे तांदूळ घरी पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू गाळण्याशिवाय पर्याय नाही.
बोगस बियाणामुळे चंद्रपूरमधील भातपीक उत्पादक शेतकरी अडचणीत हेही वाचा -मुकबधीर शाळा झाली स्मार्ट; हावभाव भाषा विकास तंत्राचे चंद्रपूरमध्ये उद्घाटन
पूर्व विदर्भ हा भातपीकाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. बाजारात नवीन आणि उच्च दर्जाच्या भातपिकाच्या जातींचे शेतकरी लागवड करून उत्पन्न घेत आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने भातपीक उत्पादक शेतकऱ्यांनी भातपिकाची लागवड केली होती. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केशर नावाच्या भातपिकाची लागवड केली होती. हे बियाणे महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या तांदळाचे असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगण्यात आले होते. हे भातपीक बारीक असल्याने बाजारात त्याला मोठया प्रमाणात किंमत येईल आणि आपल्याला थोडाफार फायदा होईल. या आशेने अनेक शेतकऱ्यांनी या भातपिकाची लागवड केली. जड तांदळाला सामान्य तांदळापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पाणीही जरा जास्त लागते.
हेही वाचा -स्वार्थाची सत्ता! वडेट्टीवारांच्या वाढदिवसाचा पडला होता विसर, मंत्री होताच शहरभर फलकांचा महापूर
शेतकऱ्यांनी सतत ३ महिने मेहनत घेतली. पण प्रत्यक्षात जेव्हा पीक निघाले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण निघालेला तांदूळ हा जाड होता. त्यांनी अधिकची चौकशी केली असता हे भातपिकाचे बियाणे तेलंगणातील असल्याचे समजले. हा तांदूळ तेलंगणातील असल्यामुळे बाजारात व्यापारी हा तांदूळ घ्यायला तयार नाही. तांदूळ जाड असून याला भाव मिळणार नाही. म्हणून बाजार समितीनेही हात वर केले आहेत. त्यामुळे मेहनतीने घेतलेले भातपिकाचे पीक घरातच ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील एकट्या धानापूर गावात साधारणत: वीस ते तीस शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली आहे. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्यातही अशाच अनेक घटना समोर आल्या आहेत.
फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांना आता न्याय मिळणार का? हा प्रश्न आहे. उत्कृष्ठ बियाणे म्हणून विक्री करताना निकृष्ट धानाचे उत्पादन झाल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता समोर येत आहे. गरीब शेतकऱ्यांना फसविण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणाची तातडीने चैकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.