चंद्रपूर -शेतीचा कामासाठी बांबू आणायला जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे आज उघडकीस आली. दिनकर ठेंगरे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने शेतकरी दहशतीत आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव जंगलालगत वसले आहे. येथील बहुतांश शेती जंगलालगत आहे. सदर वनक्षेत्र वन विकास महामंडळाचा अधिकार क्षेत्रातील आहे. शनिवारला दिनकर ठेंगरे हे शेतीचा कामासाठी बांबू आणायला जंगलात गेले होते. रात्र झाली मात्र ते घरी परतले नाही. कुटूंबीय आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध केली. वन विकास महामंडळाचा कक्ष क्रमांक 26 मध्ये ठेंगरे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गायीला वाचविण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू