चंद्रपूर -ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोलरा गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी मृत झाल्याची घटना घडली. बालाजी वाघमारे(वय-६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी वाघमारे हे शुक्रवारी रात्री शेतामध्ये राखण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वाघाने हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृत बालाजी वाघमारे शुक्रवारी रात्री शेतात राखण करण्यासाठी गेले होते. शनिवारी ते परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शेतात जाऊन शोध घेतला. तेव्हा शेताजवळील झुडपात बालाजी यांचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती समजताच गावातील नागरिकांना घटना स्थळी गर्दी केली होती.