चंद्रपूर - यवतमाळमधून आलेल्या पॉझिटिव्ह युवतीच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज हा अहवाल प्राप्त झाल्याने चंद्रपुरकरांना दिलासा मिळाला आहे. 9 मे रोजी ही कोरोनाबाधित युवती यवतमाळ जिल्ह्यातून आपल्या आईला घेऊन चंद्रपूर येथे आली होती. 11 मे रोजी तिची चाचणी केली असता काल 13 मे रोजी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
दिलासादायक..! कोरोना पॉझिटिव्ह युवतीच्या कुटुंबातील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह - chandra covid 19 test
एका युवतीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर चंद्रपूर शहरातील बाजारपेठ उघडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. कुणाल यांनी मागे घेतला आहे.

बिनबा गेट परिसर सील करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर शहरात जी बाजारपेठ उघडण्याची मुभा देण्यात आली होती. ती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी मागे घेतली. या युवतीच्या आई-वडील आणि काका-काकू यांच्या घशातील स्रावाचे नमुने काल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ज्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला. ही युवती आईच्या उपचारासाठी यवतमाळ येथे 9 एप्रिलाला गेली होती. जवळपास एक महिन्याने ती परतली होती. त्यामुळे हा संसर्ग इतक्यातच झाला असल्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित युवतीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे.