चंद्रपूर Fadnavis On Maratha Reservation :ओबीसी समाजाचे रवींद्र टोंगे यांचं आमरण उपोषण सोडविण्यासाठी आज (शनिवारी) फडणवीस चंद्रपुरात आले होते. यावेळी ते बोलत होते. उपोषणकर्त्यांना मोसंबीचा रस देऊन हे आंदोलन समाप्त झालं असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.
रवींद्र टोंग यांचे रुग्णालयातही आंदोलन सुरूच :मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान रुग्णालयात देखील त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं होतं. यादरम्यान विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी बेमुदत उपोषणावर बसले. त्यानंतर 23 सप्टेंबरला जनता महाविद्यालयासमोर नागपूर मार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आलं. तर २४ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंमत्री, बहुजन कल्याणमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली गेली. तर 25 सप्टेंबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
जिल्हा बंद आंदोलन मागे :यानंतर काल (शुक्रवारी) 29 सप्टेंबरला राज्य सरकारकडून राज्यातील ओबीसी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ओबीसी आंदोलनकर्ते पदाधिकारी देखील सामील होते. मात्र, या चर्चेत तोडगा निघाल्याने आज 30 सप्टेंबरचे जिल्हा बंद आंदोलन मागे घेण्यात आले. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी उपोषणस्थळी भेट देत हे उपोषण संपवलं.