महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बर्थडे कॅन्डलचा स्फोट; दहा वर्षीय मुलाच्या गालावर घालावे लागले 150 टाके - 150 Stitches

चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या वडिलांसोबत वाढदिवसाला आलेल्या 10 वर्षीय आरंभ डोंगरे ब्रह्मपुरी येथे ( Brahmapuri in Chandrapur ) आला होता. त्यावेळी वाढदिवसाला फवारे उडवणारी मेणबत्ती आरंभने हातात पकडली ( 10 Year Old Arambha Seriously Injured ) असता, त्याचा स्फोट झाला. त्यामध्ये आरंभ गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न ( Completely Torn and Shattered in that Blast ) होऊन आरंभ गंभीररीत्या जखमी झाला. 150 टाक्यांची तब्बल 5 तास सर्जरी करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Aarabha-Seriously-Injured
दहा वर्षीय आरंभचा गाल फाटला

By

Published : Aug 1, 2022, 12:33 PM IST

चंद्रपूर : वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फवारा उडवणारी बर्थडे कँडल वापरताय तर सावधान! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी ( Brahmapuri in Chandrapur ) येथे 10 वर्षीय आरंभ आपल्या वडिलांसोबत वाढदिवसाला आला होता. त्यावेळी आरंभने केकवर लावलेली फवारे उडविणारी मेणबत्ती हातात पकडली असता तिचा ( 10 Year Old Arambha Seriously Injured ) स्फोट झाला. त्या स्फोटात दहा वर्षीय बालकाचा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न ( Completely Torn and Shattered in that Blast ) झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे.

आरंभ गंभीररीत्या जखमी : दहा वर्षीय आरंभ डोंगरे हा भीसी गावातील आहे. तो आपल्या वडिलांसोबत मित्राच्या वाढदिवसाला आला होता. वाढदिवस सुरू असतानाच ही घटना घडली. ही कँडल हातात घेऊन आरंभ खेळत होता. मात्र, अशातच या कँडलचा अचानक जोरदार स्फोट झाला. यात आरंभ गंभीररीत्या जखमी झाला. त्याचे ओठ आणि जीभ फाटली गेली.

आरंभला तत्काळ रुग्णालयात केले दाखल : या घटनेनंतर बालकाला तत्काळ ब्रह्मपुरी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरने बालकावर प्लास्टिक सर्जरी करून 150 च्या जवळपास टाक्यांची तब्बल पाच तासांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता तो धोक्याच्या बाहेर आहे. मात्र, या घटनेमुळे बर्थडे कँडल वापराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बर्थडे कँडल सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :After Sanjay Raut Arrested : राऊतांच्या अटकेनंतर नवा ट्विस्ट; दहा लाख नोटांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचे नाव

ABOUT THE AUTHOR

...view details