चंद्रपूर- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या दुर्गापूर येथे एका गाडीत तीन ईव्हीएम मशीन सापडल्याने गदारोळ झाला. कुठलीही सुरक्षा नसताना या ईव्हीएम नेल्या जात होत्या, असा आरोप या विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी केला. त्यामुळे येथे रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दुर्गापुरात 'ईव्हीएम' सापडल्याने गदारोळ, उमेदवारांनी घेतला आक्षेप - दुर्गापूर एका गाडीत सापडल्या EVM मशीन
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या दुर्गापूर येथे एका गाडीत तीन ईव्हीएम मशीन सापडल्याने गदारोळ झाला. कुठलीही सुरक्षा नसताना या ईव्हीएम नेल्या जात होत्या, असा आरोप या विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी केला.
हेही वाचा -एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?
सोमवारी मध्यरात्री दुर्गापूर मार्गावर एक (एमएच 18 एस 1709) हे वाहन ईव्हीएम मशीन घेऊन जाताना दिसले. नागरिकांना शंका आल्याने ही गाडी अडवण्यात आली. याची माहिती काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन गाडीची चौकशी केली. कुठलीही सुरक्षा नसताना वाहन ईव्हीएम घेऊन जात आहे, असे म्हणत उमेदवारांनी आक्षेप घेतला. यामुळे तिथे तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दंगल नियंत्रण पथकाला यावेळी पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती.