चंद्रपूर:पृथ्वीवर आज केवळ 25 हजार सारस पक्षी शिल्लक आहेत. २०१८ च्या सर्वेनुसार पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात मिळून १४ हजार ९३८ पक्षी शिल्लक आहेत आणि ही संख्या झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्रात आज केवळ ४० सारस पक्षी उरले आहेत. महाराष्ट्रात भंडारा ०४, गोंदिया ३५ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ०१ सारस क्रेन पक्षी आढळले आहेत. मात्र चंद्रपूर येथे २० वर्षापूर्वी जुनोना येथे ४ सारस पक्षी होते १० वर्षापूर्वी केवळ १ पक्षी उरला होता आता हा एकमेव सारस मागील वर्षीपासून दिसेनासा झाला आहे. विदर्भात १०३ सारस पक्षी संख्या होती ती आता घटून ४० झाली आहे.
Protection Of Rare Crane : दुर्मिळ सारसच्या बचावासाठी 9 सदस्यांची ‘ संवर्धन समिती ’ - Sarus Crane-Grus-Antigone
गोंदियाच्या सेवा संस्थेने विदर्भातून सारस पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे निरीक्षण प्रकाशित केले होते, त्याची दखन घेत न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि अनिल पानसरे यांनी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे लुप्त होणाऱ्या सारस क्रेन पक्षाच्या संवर्धनासाठी (Protection Of Rare Crane) समितीची स्थापन करण्याचे ('Conservation Committee' for the protection of rare Crane ) आदेश शासनाला दिले होते. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारीअजय गुल्हाने (Collector Ajay Gulhane) ह्यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
![Protection Of Rare Crane : दुर्मिळ सारसच्या बचावासाठी 9 सदस्यांची ‘ संवर्धन समिती ’ rare Crane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14529771-thumbnail-3x2-saras.jpg)
सारस पक्षी संकटात
सारस क्रेन पक्षी संकटग्रस्त (Vulnerable) श्रेणीत आणि वन्यजीव अधिनियमा नुसार शेडूयुल ४ मध्ये येतो. जगात सारस हा उडू शकणारा सर्वात मोठा पक्षी आहे आहे, परंतु उच्च दाबाच्या वीज वाहिन्या, रायासानिक खते आणि कीटकनाशके, अंडी खाणारे, मांसभक्षी प्राणी, अंडी चोरने आणि बदललेली पिक पद्धती हे ह्या पक्षाच्या नष्ट होण्यासाठी कारणीभूत घटक आहेत.
सारस पक्षाचे वैशिष्ट्य
सारस क्रेन ( Sarus Crane-Grus-Antigone) हा उडू शकणारा जगातील एकमेव पक्षी आहे. उत्तरप्रदेशाचा तो राज्य पक्षी आहे. त्याचा अधिवास तळे, नदी, जवळील धानाची शेती आणि पाणथळ-गवताळ प्रदेशात असते. त्याची उंची ५ फुट आणि पंखांची लांबी ८ फुट, वजन ७ किलो असू शकते. हे पक्षी आयुष्यभर जोडी करून राहतात आणि वर्षातून पावसाळ्यात केवळ २ अंडी देतात. कित्येक किलोमीटरवरून या पक्ष्यांचा मोठा आवाज ऐकायला येतो. लाल मान आणि डोके असलेल्या ह्या पक्षांचा जीवनकाळ जवळजवळ २० वर्षाचा असतो . ह्यांना प्रेम आणि समर्पणाचे प्रतिक म्हणून भारतात प्राचीन काळापासून मानले जाते.
अशी आहे समिती
चंद्रपूर जिल्हा सारस संवर्धन समिती १) अध्यक्ष- जिल्हाधिकारी , चंद्रपूर 2) सदस्य सचिव - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,चंद्रपूर ३) सदस्य -विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वन विभाग ४) कार्यकारी अभियंता- जलसंपदा विभाग ५) जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग ६) विभागीय वन व्यवस्थापक, चंद्रपूर ह्याच सोबत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सेवा संस्था गोंदियाचे ७) अंकित सिंग ठाकूर ८) निमंत्रित सदस्य म्हणून ग्रीन प्लानेट सोसायटीचे चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ९) इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे ह्यांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यातील पक्षांचे अस्तित्व, स्थिती, र्हासाची कारणे आणि उपाय योजना सुचविणार आहे.