चंद्रपूर - तामिळनाडू येथील एका सराफा दुकानात लूट करून अडीच कोटींचे दागिने नेण्याचा टोळीचा ( jewelry shop theft case ) प्रयत्न फसला आहे. बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी ( Ballarpur railway Police ) चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तीन किलो सोने आणि 27 किलो चांदी असा मुद्देमाल ( Rs 2 crore jewelry ) जप्त करण्यात आला.
बिहार येथील चार आरोपी यांनी तामिळनाडू राज्यातील त्रिपूर ( Tripur gold shop theft case ) या शहरातील एका सराफा दुकानाला फोडले. त्यातील सोने आणि चांदीचा संपूर्ण माल घेऊन त्यांनी पळून जाण्याचा बेत ( gold silver theft case ) आखला. हा सर्व माल घेऊन त्यांनी रेल्वेने चेन्नई गाठले. यानंतर दरभंगा एक्सप्रेसने ते बिहारकडे ( Thieves in Dabhanga Express ) येत होते. चोरी करताना हे सर्व चोर सीसीटीव्हीत कैद झाले. त्यानुसार या चारही संशयितांची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार रेल्वे पोलीस पाळत ठेऊन होते.
एकाच रेल्वेत वेगवेगळ्या डब्यात लपले चोर
आज ही ट्रेन बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आली असताना हे संशयित लोक ट्रेनच्या वेगवेगळ्या डब्यात हालचाल करताना दिसून आले. एस 7 डब्यात एक, एस 9 मध्ये दुसरा, तिसरा प्लॅटफॉर्मवरून पळत होता. चौथा आरोपी एसीच्या डब्यात झोपून होता. या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या सामानाची पाहणी केली असता त्यांच्याकडून तीन किलो 300 ग्रॅम सोने आणि तब्बल 27 किलो चांदी जप्त करण्यात आली.