चंद्रपूर- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. येथे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात येते. त्यांनी मागणी केल्यास कंपनीकडून त्यांचा छळ केला जातो. त्यांना कामावरून काढण्याची धमकी देण्यात येते. यावर कारवाई करण्यास वीज केंद्रातील प्रशासन देखील टाळाटाळ करते. याविरोधात शिवसेना प्रणित कंत्राटी कर्मचारी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 2 फेब्रुवारीपासून या संघटनेने कामबंद संप पुकारला आहे. यादरम्यान कंत्राटी कर्मचारी कामावर जाणार नाहीत. तर कंपनीच्या गळचेप्या भूमिकेचा निषेध करणार आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्यांपासून ठेवले जाते वंचित-
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात बरेच काम हे कंत्राटी पद्धतीने चालते. त्याचे कंत्राट अनेक कंपन्यांना दिले जाते. यातूनच अनेक कंपन्या बड्या झाल्या. यामध्ये अडुरे, भावना, रुचिकुची, प्रीमियम, कुणाल ओमेगा-डेल्टा, सांद्रोज, श्री ओम, कोटनका, एस. एस. दुबे या कंपन्यांनचा समावेश आहे. त्यांनी आपले साम्राज्य येथे पसरवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्यांपासून वंचित ठेवले जाते. किमान वेतन व इतर भत्ते त्यांना दिले जात नाहीत. कुशल कामगारांना त्यांच्या श्रेणीनुसार मासिक वेतन दिले जात नाही. 20 टक्के पूरक भत्त्याचा एरियस दिला जात नाही. दिवाळीचा बोनस त्यांना मिळत नाही. आठ तास न ठेवता त्यांच्याकडून 12 तास काम करून घेतले जाते. मागणी केल्यास कामगारांना त्रास दिला जातो. त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. कामगार संघटनेत सामील झाल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे अशा कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कंत्राटी कर्मचारी सेनेने सातत्याने पाठपुरावा केला.
2 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन-