चंद्रपूर- अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशातील संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. मात्र, कितीही विपरीत संकट ओढावले तरी हिंदू-मुस्लिम एकतेला तडा जाणार नाही, याची प्रचिती कोरपणा शहरात आली. ईद निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत हिंदू बांधवानी सहभाग घेत मुस्लिम बांधवांसाठी अल्पोहाराची व्यवस्था केली होती.
'राम भी यहीं, रहीम भी यहीं', चंद्रपूरमध्ये ईदच्या रॅलीत घडले एकतेचे दर्शन - EideMilad
कोरपणा शहरात हजरत पैगंबर जयंती निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन मुस्लिम बांधवानी केले होते. रॅलीमध्ये मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहभागी असलेल्या मुस्लिम बांधवांसाठी अल्पोहाराची व्यवस्था केली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे जामा मशीद कमेटीद्वारा शहरात हज़रत मंहमद पैगंबर(स.अ.स.)जयंती निमीत्याने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत हिंदू बांधवानी सहभाग घेत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर रॅलीत सहभागी झालेल्या बांधवांसाठी हिंदू बांधवानी अल्पोहाराची व्यवस्था केली होती. रॅलीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले.
कोरपणा शहरात हजरत पैगंबर जयंती निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन मुस्लिम बांधवानी केले होते. रॅलीमध्ये मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहभागी असलेल्या मुस्लिम बांधवांसाठी अल्पोहाराची व्यवस्था केली होती. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायल्याने दिलेला निर्णय स्वागतार्थ आहे. देशात एका नविन पर्वाची सुरुवात होईल. एकता, अखंडता, भाईचारा व सौहार्द वातावरण निर्माण होईल. असा विश्वास आबिद अली यांनी व्यक्त केला. या निर्णयाने हिंदू-मुस्लिम एकतेला बळ मिळाले आहे, अशी भावना मुस्लिम बांधवानी व्यक्त केली. असरार अली, नवाज शेख, साजीद अली, सुहेल अली, इमरान कुरैशी, खलील कुरैशी, शौकत अली, इस्माईल शेख, नईम लुंडा, फहीम असलम, सलमान रहेमान, मजीद नवा, जिश अलताब बेग आदी रॅलीत उपस्थित होते.