महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब; ईको-प्रो संस्थेस 'राष्ट्रीय युवा पुरस्कार' जाहीर - इको-प्रो संस्था पुरस्कार

युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार चंद्रपूर येथील पर्यावरण, वन-वन्यजीव व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ईको-प्रो संस्थेस जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब; ईको-प्रो संस्थेस 'राष्ट्रीय युवा पुरस्कार' जाहीर

By

Published : Aug 11, 2019, 9:02 AM IST

Updated : Aug 11, 2019, 2:30 PM IST

चंद्रपूर -युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार चंद्रपूर येथील पर्यावरण, वन-वन्यजीव व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ईको-प्रो संस्थेस जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब; ईको-प्रो संस्थेस 'राष्ट्रीय युवा पुरस्कार' जाहीर

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातर्फे दरवर्षी युवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक व संस्थाना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे उद्देश राष्ट्रीय विकास व समाजसेवेच्या क्षेत्रात तरूणांना उत्तेजन देणे, समाजाप्रती जबाबदारीची भावना विकसित करणे आणि स्वतः एक चांगले नागरिक होण्यासाठी युवकांमध्ये जागृती वाढवणे आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार १९८५ पासून दिले जात आहेत. दरवर्षी युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 'राष्ट्रीय युवा दिना'चे औचित्य साधत राष्ट्रीय युवा पुरस्कार दिले जात होते. यंदा मात्र या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय युवा दिन निमीत्ताने 12 ऑगस्टला दिले जाणार आहेत.

राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 करिता राज्यातुन इको-प्रो संस्थेची निवड करण्यात आलेली आहे. ईको-प्रो संस्था मागील 15 वर्षापासून युवकांच्या माध्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पर्यावरण, वन-वन्यजीव, आपात्कालीन व्यवस्थापन, पुरातत्व ऐतिहासिक वारसा संवर्धन, रक्तदान शिबिरे, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात कार्य सुरू असून वेळोवेळी संस्थेच्या विविध क्षेत्रातील कार्याकरता इको-प्रो संस्थेस गौरवण्यात आलेले आहे. यापर्वी संस्थेस ‘जिल्हा युवा पुरस्कार’ व 'राज्य युवा पुरस्कारा'ने सुध्दा सन्मानित करण्यात आलेले आहे.

ईको-प्रो संस्थेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे. यामुळे संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण होणार असून मागील अनेक वर्षापासून संस्थेच्या कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेणारे आणि सहकार्य करणारे संस्थेचे युवक व नागरिकांचा सुध्दा हा सन्मान आहे. येत्या 12 ऑगस्टला या एका कार्यक्रमात ईको-प्रो संस्थेस पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे एका पत्रकाद्वारे नुकतेच संस्थेस कळवण्यात आले.

Last Updated : Aug 11, 2019, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details