महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध प्रवासी वाहतुकीचा चिमूर आगाराला फटका

महाराष्ट्राची शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत वाहतुकीचे साधन म्हणजे एसटी आहे. मात्र, शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या चिमूर आगारास अवैध प्रवासी वाहतुकीचा विळखा वाढतच चालला आहे.

chandrpur
अवैध प्रवासी वाहतुकीच्या चिमूर आगाराला फटका

By

Published : Dec 21, 2019, 2:10 PM IST

चंद्रपूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गाव तेथे बससेवा सुरू करण्यात आल्याने सर्व सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी आणि नोकरदारांना वाहतुकीची सोय झाली. मात्र, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीने चिमूर आगार मासिक अठरा लाखाच्या तोट्यात असल्याने अनेक बस फेऱ्या रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.

अवैध प्रवासी वाहतुकीचा चिमूर आगाराला फटका

हेही वाचा -नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात जनसमुदाय रस्त्यावर; त्वरित कायदा रद्द करण्याची मागणी

महाराष्ट्राची शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत वाहतुकीचे साधन म्हणजे एसटी आहे. मात्र, शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या चिमूर आगारास अवैध प्रवासी वाहतुकीचा विळखा वाढतच चालला आहे. चिमूर-नागपूर मार्गावर खासगी बसेसच्या ६० फेऱ्या, चिमूर ते चंद्रपूर ४० फेऱ्या आणी नव्याने सुरू करण्यात आलेल्या खासगी मिनी बसच्या चिमूर-वरोरा ४० फेऱ्या आहेत. त्यात भर ट्रॅक्स, काळी पिवळी ह्या शेकडो आहेत. मर्यादेपेक्षा जादा प्रवासी व विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने 'रापम'च्या बसेसची मिळकत घटली आहे.

हेही वाचा -चंद्रपूरकरांनो सावधान! तुम्ही खाताहेत सांडपाण्यात धुतलेला भाजीपाला

आगाराच्या प्रवेश द्वारावरून खासगी वाहतूक सुरू आहे. कमी मिळकत झाल्याने याचा जाब कर्मचाऱ्यांना द्यावा लागत असल्याने कर्मचारी मानसिक तणावात काम करत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीसंबधी तसेच २०० मिटर नो पार्कींग झोनचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्यासंबधी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, परिवहन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन यांना तसेच लोकप्रतिनिधींना लेखी पत्र देण्यात आले . मात्र, या पत्राची दखल घेऊन प्रभावी उपाय योजना सरकारकडून झालेली दिसुन येत नाही. त्यामूळे आगार व्यवस्थापकाच्या पत्राला केराची टोपली दाखवुन अवैध प्रवासी वाहतुकीस सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -चंद्रपुरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अन् एनआरसीविरोधात निदर्शने

चिमूर आगाराचा एप्रिल २०१९ पासुन नोव्हेंबर २०१९ पर्यंत आगाराचा संचित तोटा १ कोटी, मासिक १८ लाख तोटा झाला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देऊन चिमूर आगार बंद करण्याचा घाट तर नाही ना अशी शंका कर्मचारी व्यक्त करीत असुन हायटेक बस स्थानक काय खासगी प्रवासी व अवैध प्रवासी वाहतुकीकरता निर्माण केले जात आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details