चंद्रपूर -गेल्या चोवीस तासांपासून चिमूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, नागरिकांना सुरक्षित ठीकाणी हलवण्यात येत आहे.
चिमूर तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत - अतिवृष्टीमुळे चिखलापर गावा चा संपर्क तुटला
गेल्या चोवीस तासांपासून चिमूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, नागरिकांना सुरक्षित ठीकाणी हलवण्यात येत आहे.
चिमूर तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला
शेजारच्या अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मात्र, चिखलपार गावाला सर्वाधिक धोका उत्पन्न झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील लोकांना सुरक्षित ठीकाणी हलवण्यासाठी आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतआहे. उपविभागीय अधिकारी बेहरे हे स्वतः गावात उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य सुरू आहे. स्थलांतरीत नागरिकांसाठी सहकारी राइस मिल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.