चंद्रपूर- येथील चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे झालेल्या मुसळधार पावसाने ३८ घरांची पुर्णता पडझड झाली. तेव्हा पासून हे नागरिक किरायाने, नातलगाकडे राहत आहेत. या पैकी सहा कुटुंब तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या इमरातीमध्ये वास्तव्यास असून झोपायला शाळेत जात आहे. अशा प्रकारे या कुटुंबाला आपल्याच गावात निर्वासितांचे जिणे जगाव लागत आहे.
चंद्रपुरात आपल्याच गावात पुरग्रस्त झाले निर्वासित हेही वाचा-सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
चिमूर तालुक्यामध्ये सततच्या पावसाने अनेक गाव जलमय झाले होते. ४ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसाने आणि गावालगतची बोडीची पार फुटल्याने संपूर्ण पळसगावात पाणी शिरले. यामुळे ३८ घरांचे पुर्णता नुकसान झाले. या ३८ कुटुंबापैकी मारोती पत्रु शेंडे, विश्वनाथ ऋषी सोनुले, गोकुल ऋषी सोनुले, महानंदा अंबुज गुढधे, नामदेव जानु गावतुरे, श्रीकुष्ण मनिराम चौधरी असे एकुण ६ कुटुंबातील २२ व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये वास्तव्यास गेल्या. मात्र, आज तीन महिन्याचा कालावधी उलटल्या नंतर सुद्धा शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यांना राहण्याची व्यवस्था केलेली नाही.
लोकप्रतिनिधी आणि शासनाचे कर्मचारी येऊन आश्वासन देऊन गेल. मात्र, त्याचा काहीच फायदा झालेला नाही. अखेर या कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना याची लेखी माहीती देऊन मदत व घरकुल मंजूर करून देण्याची विनंती केली. मात्र, तुटपुंज्या मदतीचे ३८ कुटुंबाला धनादेश वाटप करण्यात आले. मात्र, या तुटपुंज्या मदतीने बोळवण केल्याने गावकरी हताश झाले आहेत. शासन स्तरावरून विषेश बाब म्हणून या कुटुंबाना घरकुल मंजुर करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.