महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नक्षलवाद्यांची दहशत झुगारून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. चरणजितसिंग सलुजा यांचा राष्ट्रपती जीवन रक्षा पदकाने गौरव - वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

गडचिरोलीच्या अहेरी येथील डॉ. चरणजितसिंग सलुजा यांना 'राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा' पदक देण्यात आले. डॉ. सलुजा यांनी नक्षल दहशत मोडून आदिवासींसाठी केलेल्या कार्यानिमित्त त्यांचा गौरव झाला.

गडचिरोलीच्या अहेरी येथील डॉ. चरणजितसिंग सलुजा यांना 'राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा' पदक

By

Published : Aug 15, 2019, 11:29 PM IST

चंद्रपूर - शहरात आज ७३ व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. गडचिरोलीच्या अहेरी येथील डॉ. चरणजितसिंग सलुजा यांना 'राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा' पदक देण्यात आले. डॉ. सलुजा यांनी नक्षल दहशत मोडून आदिवासींसाठी केलेल्या कार्यानिमित्त त्यांचा गौरव झाला.

गडचिरोलीच्या अहेरी येथील डॉ. चरणजितसिंग सलुजा यांना 'राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा' पदक
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हिरवळीवर ७३ वा स्वातंत्र्यदिन सोहळा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात पार पडला. या कार्यक्रमानंतर मुनगंटीवार यांनी चरणजितसिंग सलुजा यांचा गौरव केला. काही दिवसांपूर्वी डॉ. सलुजा यांना, 'राष्ट्रपती उत्तम जीवनरक्षा पदक' जाहीर झाले होते. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन डॉ. सलुजा यांनी केले आहे. जिल्ह्यातील नक्षल दहशत मोडत डॉ. सलुजा आदिवासींच्या सेवेसाठी निष्ठेने कार्यरत आहेत.३ मे २०१८ रोजी भामरागडच्या जंगलात नक्षल चकमक आणि भूसुरुंग स्फोटादरम्यान २२ पोलीस जवान जखमी झाले होते. मार्गावर अनेक ठिकाणी भूसुरुंग पेरले असण्याची शक्यता होती. मात्र, जीवाची पर्वा न करता डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी घटनास्थळ गाठत २२ जवानांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या अतुलनिय कामगिरीसाठी त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details