महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुहेरी हत्याकांड: जेवण देण्याच्या वादावरून सुन आणि बायकोचा खून

कॅन्सरग्रस्त पत्नीच्या देखभालीबाबत सुनेसोबत नेहमी खटके उडणारा वाद अखेर विकोपाला गेला. या रागाच्या भरात सासऱ्याने सुनेला आयुष्यातून संपवले आहे. तर आपण तुरुंगात गेल्यावर पत्नीचा कोण सांभाळ करणार, या विचारात त्याने कॅन्सरग्रस्त पत्नीलाही संपविले आहे.

कॅन्सरग्रस्त पत्नी
कॅन्सरग्रस्त पत्नी

By

Published : Jul 17, 2021, 7:36 PM IST

चंद्रपूर - कॅन्सरग्रस्त पत्नीच्या देखभालीबाबत सुनेसोबत नेहमी खटके उडणारा वाद अखेर विकोपाला गेला. या रागाच्या भरात सासऱ्याने सुनेला आयुष्यातून संपवले आहे. तर आपण तुरुंगात गेल्यावर पत्नीचा कोण सांभाळ करणार, या विचारात त्याने कॅन्सरग्रस्त पत्नीलाही संपविले आहे. तशी कबुली आरोपीने दिली आहे. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात घडली आहे.

दुहेरी हत्याकांड: जेवण देण्याच्या वादावरुन सुन आणि बायकोचा खून

दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरले

जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाने तपास करणारे पोलीस देखील सुन्न झाले. शहरातील शिवाजी वार्डात राहणाऱ्या काजल डे (वय 58) यांची पत्नी 'आशा' कर्करोगाने पीडित होती. दीर्घकाळ रूग्णालयात राहिल्यानंतर ती नुकतीच घरी परतली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सून प्रियंका व्यवस्थित देखभाल करत नसल्याने घरात नेहमी वाद निर्माण होत होते. आपले काम आटोपून घरी आलेल्या आरोपीने आजारी पत्नीला जेवण दिले का? याबाबत सुनेला विचारले. यावरून "वेळ मिळेल तेव्हा देईन" असे उत्तर सुनेकडून मिळाले आणि भांडणाला सुरुवात झाली. भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजल याने सून प्रियंका हिचा गळा आवळून खून केला. मात्र, आपण या घटनेनंतर आपण तुरुंगात जाऊ आणि आपल्या पश्चात आजारी पत्नीची देखभाल कोणीही करणार नाही. या चिंतेने त्याने मरणासन्न अवस्थेतील पत्नीचाही गळा आवळून खून केला. त्याच स्थितीत काजल डे याने बल्लारपूर पोलीस ठाणे गाठले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी अटकेत

दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघींनाही रुग्णालयात नेले. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता. तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला. अशा रीतीने 'जेवण देण्याच्या वादावरून' दोघांचे जीव गेले. बल्लारपूर पोलीस ठाण्यात काजल डे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काजल डे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा -पंधरा दिवसांत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा घेणार - वर्षा गायकवाड

ABOUT THE AUTHOR

...view details