महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुसऱ्या लसीनंतरदेखील तीन वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह; मात्र डॉक्टर म्हणाले काळजी नको...कारण - चंद्रपूर कोरोना लसीकरण घडामोडी

दुसरी लस घेऊनही जिल्ह्यातील तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांच्यासह अन्य दोन डॉक्टरांचा समावेश आहे. पण, डॉक्टरांनी घाबरून जाण्याची गरज नसून हा प्रकार कशामुळे झाल्याचे कारण सांगितले.

चंद्रपूर
चंद्रपूर

By

Published : Mar 14, 2021, 5:47 PM IST

चंद्रपूर- कोरोनाची दुसरी लस घेऊनही जिल्ह्यातील तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांच्यासह अन्य दोन डॉक्टरांचा समावेश आहे. या वृत्ताला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दुजोरा दिला आहे.

चंद्रपूर
सध्या कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, तरीही कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही लस संपूर्णता सुरक्षित असून देखील याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनाच्या काळात पहिल्या फळीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पहिल्यांदा लसीकरण करण्यात आले. यापैकी दोन्ही लसी घेतल्यानंतर देखील तीन डॉक्टर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत हजारे आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार हजारे यांनी पहिली लस ही 24 जानेवारीला घेतली तर दुसरी लस 23 फेब्रुवारी रोजी घेतली. मात्र तरीही ते पॉझिटिव्ह आढळून आले.
चिंतेचा विषय नाही : जिल्हा शल्य चिकित्सक


कोरोनाची पहिली लस घेतल्याच्या 57 दिवसानंतर कोरोनाशी लढण्याची शंभर टक्के रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. मात्र, याच्यापूर्वी कोरोना झाला तरीही तो इतका धोकादायक नसतो. कारण मानवी शरीरात त्याला प्रतिकार करण्याची क्षमता तयार झालेली असते. पहिली लस घेतल्याच्या 14 दिवसांनी जवळपास 70 टक्के रोगप्रतिकारक्षमता मानवी शरीरात तयार होते. त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरी लस घेतल्यानंतर पुढील 14 दिवसानंतर शंभर टक्के रोगप्रतिकारक्षमता तयार होते. या तिन्ही डॉक्टरांना लस घेतल्याच्या 57 दिवसांच्या पूर्वी कोरोना झाला. देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण असून नागरिकांनी कोरोना लस घ्यावी. ती संपूर्णतः सुरक्षित आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details