चंद्रपूर : बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी सोमवारी विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. शितल आमटे यांच्या मृत्यूविषयी आमटे कुटुंबाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे चुलत भाऊ डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना फारच धक्कादायक-अनपेक्षित असल्याचे विधान त्यांनी केले आहे. आम्ही सर्वजण धक्क्यात असून सध्या काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.
कुष्ठरुग्णांचे आईचे छत्र हरपले -
डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनं आनंदवनात संपूर्ण स्मशानशांतता पसरली आहे. अनेकांचा अजूनही यावर विश्वास बसला नाही आहे. शीतल आमटे यांच्या अचानक जाण्याने अनेकांना काय बोलावे हेच समजत नाही आहे. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि हसमुख स्वभावाच्या शितल आमटे आपल्यात नाही या धक्क्यातून ते अजूनही सावरले नाहीत.