चंद्रपूर- संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लखलखत्या निखाऱ्यांनी तुडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालतात. वयोवृद्ध, लहान आणि महिलाही या अग्नीकुंडातून चालत जातात. अग्नी कुंडातील निखाऱ्यांवरून चालल्यास शारीरिक आणि मानसिक शुध्दी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
महाराष्ट्र-तेलंगणातील आराध्य दैवत असलेल्या संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव संतनगरीत सुरू आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे 'अग्नीकुंड प्रभावळी'चा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खोदला जातो. त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची विधीवत पूजा केली जाते. त्यानंतर मग लखलखत्या निखाऱ्यांवरून चालत भाविक पुढे जातात.