चंद्रपूर- जम्मू काश्मीरला कलम 370 देण्याचे महापाप ज्या काँग्रेसने केले होते. तो कलंक पुसण्याचे काम आज भाजप सरकारने केले आहे. हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस असून काश्मीरला आपल्या देशापासून तोडण्याचा पाकिस्तानचा मनसुबा कायमचा दफन झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपुरात दिली. ते महाजनादेश यात्रेनिमित्त येथे आले होते.
कलम 370 : जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवणारा निर्णय - मुख्यमंत्री - जम्मू-काश्मीर
काश्मीरला आपल्या देशापासून तोडण्याचा पाकिस्तानचा मनसुबा कायमचा दफन झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपुरात दिली.
![कलम 370 : जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवणारा निर्णय - मुख्यमंत्री](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4048163-thumbnail-3x2-cm.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही आमच्या लहानपणापासून एकच नारा दिला 'जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है', आज ही मागणी सत्यात उतरली आहे. जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवणारा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्यामुळे कलम 370 रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मोदी आणि शहा खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत.