महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस, मंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी; विदर्भवादी नेत्यावर गुन्हा दाखल

Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Threat : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी विदर्भवादी कार्यकर्ते बाबाराव मस्की यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सोशल मीडियावर धमकी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 9:35 PM IST

Updated : Nov 21, 2023, 10:00 PM IST

चंद्रपूर Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Threat : 17 नोव्हेंबरला सोशल मीडियावर विदर्भवादी कार्यकर्ते बाबाराव मस्की (Babarao Maski) यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपा कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.

बाबाराव मस्कींविरोधात तक्रार दाखल : याप्रकरणात गडचांदूर पोलीस स्टेशन (Gadchandur Police Station) येथे बाबाराव मस्की यांच्यावर भारतीय दंडसंहिता 1860 कलम 294 /560 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाबाराव मस्की (Babarao Maski) यांच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशनमध्ये (Rajura Police Station) तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे, कामगार आघाडी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदिप पारखी, अनुसूचित जाती मौर्चा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव जिवणे, प्रमोद लांडे, संजय जयपुलकर यांच्या शिष्टमंडळानं तक्रार दाखल केली होती.

जीवे ठार मारण्याची दिली धमकी : राजुरा तालुक्यातील बाबाराव मस्की हे कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात. तसेच ते अनोख्या आंदोलनांमुळे प्रसिद्ध आहेत. मस्की यांनी नुकतेच सोशल मिडीयावर फडणवीस व मुनगंटीवार यांच्यावर टीका करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी बाबाराव मस्की यांच्याविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर घटनेचा अधिक तपास राजुरा पोलीस करत आहेत.

मुकेश अंबानी यांना देखील जीवे मारण्याची धमकी : याआधीही रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडं 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

हेही वाचा -

  1. sextortion in pune : मोबाईलवर चॅटिंगनंतर न्यूड कॉलिंग; तरुणीच्या मानसिक त्रासाने तरुणाने संपवले जीवन
  2. सोशल मीडियावर फोटो टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार;डहाणूतील घटना
  3. हनुमान महाराजांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आत्महत्येची धमकी
Last Updated : Nov 21, 2023, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details