चंद्रपूर -चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालगत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफ्फर झोन लागत असलेल्या खडसंगीपासून दीड किमी अंतरावरील मुरपार फाट्याजवळ अनेक जंगली प्राणी ताडोबा बफ्फर क्षेत्र ते मुरपार प्रादेशिक क्षेत्रात ये-जा करत असतात. त्यामुळे या जंगल परिक्षेत्रात वाघ, बिबट्या, चितळ, हरिण, अस्वल, डुक्कर यासारख्या अनेक प्राण्यांचा नेहमी वावर असतो, त्यातच आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जंगलातील ठिकठिकाणी असलेले पाणवठे कोरडे पडले आहेत.