चंद्रपूर -नागभीड शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरूमाच्या खाणीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागभीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटली असून सोनु असलम खान पठाण (वय, २८) असे या महिलेचे नाव आहे.
नागभीड येथील गोसेखुर्द कॉलनी परिसरात काहीतरी कुजल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी खाणीच्या परिसरात शोध घेतला असता, सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. नागरिकांनी तत्काळ याची सूचना नागभीड पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाअंती हा मृतदेह सोनु अस्सलम खान पठाण महिलेचा असल्याचे समजले.