चंद्रपूर - मागील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मच्छीमाराचा अखेर शोध लागला आहे. बेपत्ता मच्छिमाराचा इराई डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अभिजित सरबाजीत मंडल (वय, 26) असे मृत मच्छिमाराचे नाव आहे.
दोन दिवसांपासून बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह आढळला; चंद्रपुरच्या इराई डॅममध्ये बुडून झाला मृत्यू - erai dam
मागील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मच्छीमाराचा अखेर शोध लागला आहे. बेपत्ता मच्छिमाराचा इराई डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दुर्गापूर पोलीस ठाणे
अभिजीत हा रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी इराई डॅममध्ये गेला होता. मात्र तो घरी परत आला नाही. त्यामुळे वडिल सरबजित मंडल यांनी याबाबतची तक्रार दुर्गापुर स्टेशन मध्ये केली. दुर्गापूर पोलिसांनी सोमवारी रात्री शोधमोहीम राबविली. मात्र अभिजितला शोधण्यात अपयश आले. अखेर मंगळवारी सकाळी अभिजीतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला. आणि शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करिता पाठविला. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.