महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dead Foetus Found :  रुग्णालयातील शौचालयाची पाईपलाईन तुंबली ; सफाई करताना सापडले तीन महिन्यांचे अर्भक

उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे शौचालयाची सफाई कामगार करत (dead foetus found in hospital toilet seat) होते. सफाई करताना लोखंडी सळाखला लागून तीन महिन्यांचे मृत अर्भक बाहेर (dead foetus found) आले. राजुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३१५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Dead Foetus Found
उपजिल्हा रुग्णालय राजुरा

By

Published : Dec 15, 2022, 7:22 AM IST

चंद्रपूर : रुग्णालयातील शौचालयातील पाईपलाईन तुंबल्याने सफाई कामगाराला बोलाविण्यात आले. पाईपलाईनची सफाई करताना चक्क तीन महिन्यांचेअर्भक बाहेरआले. ही घटना राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील (dead foetus found in Chandrapur) आहे.



अभ्रक बाहेर :उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील शौचालयाच्या सीटमध्ये अंदाजे दोन ते अडीच महिन्याचे मृत अभ्रक आढळून आल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान सफाई कामगार सफाई करताना उघडकीस आल्याने रुग्णालयात एकाच धावपळ दिसून आली आहे. शौचालयाच्या सीटमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सफाई कामगार यांना पाहण्यासाठी सांगितले. सफाई कामगार यांनी सीटमधून पाणी जात नसल्याने लोखंडी सळाख टाकून पाहिले असता त्या सळाखला लागून अंदाजे दोन ते अडीच महिन्याचे नाळ न कापलेले पुरुष जातीचे अभ्रक बाहेर (dead foetus found in hospital toilet seat) आले.

मोठी घटना :ही माहिती सफाई कामगार यांनी लगेच डॉक्टर यांना दिली. डॉक्टरांनी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान या घटनेची माहिती राजुरा पोलीस स्टेशनला दिली असता राजुरा पोलिसांनी सदर मृत अभ्रकाचे रक्त तापसणीकरिता घेतले आहे. मात्र रुग्णालयात एवढी मोठी घटना घडत असताना कोणालाच यासंबंधी माहिती न होणे हे आश्चर्याचे असून रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असताना अभ्रक आले कुठून ? ते अभ्रक शौचालयाच्या सीटमध्ये टाकून जाण्याची हिंमत कशी काय झाली ? याबाबत तर्कवितर्क लावले जात (dead foetus found) आहे.

मृत नवजात अभ्रक : राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त अशी नवीन इमारत तयार करून त्याठिकाणी रुग्णांवर उपचार केला जात आहे. मात्र अशा प्रकारे निर्दयी काळीज असणाऱ्या मातेने आपल्या अभ्रकाला शौचालयाच्या सीटमध्ये का टाकले? त्या अभ्रकाचे आई-वडील कोण असतील यासह अनेक प्रश्न याठिकाणी निर्मान होत आहे. यापूर्वी काही वर्षा अगोदर या अगोदरच्या ग्रामीण रुग्णालयात शौचालयाच्या टाक्यात काही मृत नवजात अभ्रक आढळले होते. त्यात एक डॉक्टरवर गुन्हा दाखल केला होता. अशीच घटना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात समोर आली असून राजुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३१५ अन्वये गुन्हा नोंद केला असून समोरील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर व उपपोलीस निरीक्षक वडतकर करित (foetus found in hospital) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details