महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान - चंद्रपुरात धान पिकाचे नुकसान

गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, या पावसामुळे शेतात उभे असलेले धान पीक आडवे झाले आहे.

चंद्रपुरात परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान

By

Published : Oct 18, 2019, 9:54 AM IST

चंद्रपूर- गोंडपिपरी तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. या पावसाच फटका धान पिकांना बसला असून गोंडपिपरीतील शेकडो हेक्टरवरील धान पिकाला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान

हेही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजपमध्ये प्रवेश

गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, या पावसामुळे शेतात उभे असलेले धान पीक आडवे झाले आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे धान पीक चांगले आले आहे. सध्या अशात पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details