चंद्रपूर - ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ असे ग्रामीण भागात उपहासाने बोलले जाते. याचा प्रत्यय राजुरा तालुक्यात बघायला मिळत आहे. एका साध्या बंधाऱ्याचे बांधकाम पूर्णत्वास जाण्यासाठी तब्बल चौदा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. बरे एक नव्हे दोन नव्हे चक्क चार आमदारांनी सत्ता गाजविली. मात्र, बंधारा उपेक्षितच राहिला. अखेर चौदा वर्षांनंतर शासनाला जाग आली अन् अर्धवट बंधारा नजरेस पडला. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी 67 लाखांचा निधी मंजूर झाला असून बंधाऱ्याच्या निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर आहे.
... अन् अर्धवट बंधारा पूर्ण झाला; चार आमदारांचा कार्यकाळ लागला पणाला
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर सन 2006 मध्ये बंधाऱ्याचे बांधकाम मंजूर झाले. बांधकामाला सुरुवात झाली. अर्धवट बांधकामानंतर निधी अभावी बांधकाम रखडले. अर्धवट बांधकाम झालेला हा बंधारा मागील चौदा वर्षांपासून जैसे-थे उभा आहे. या चौदा वर्षात राजुरा विधानसभा क्षेत्रात चार आमदारांनी सत्ता भोगली.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर सन 2006 मध्ये बंधाऱ्याचे बांधकाम मंजूर झाले. बांधकामाला सुरुवात झाली. अर्धवट बांधकामानंतर निधी अभावी बांधकाम रखडले. अर्धवट बांधकाम झालेला हा बंधारा मागील चौदा वर्षांपासून जैसे-थे उभा आहे. या चौदा वर्षात राजुरा विधानसभा क्षेत्रात चार आमदारांनी सत्ता भोगली. मात्र, एकाही आमदाराला हा अर्धवट बंधार दिसला नाही. आता मात्र प्रशासनाची नजर या बंधाऱ्यावर पडली आहे. बंधाऱ्याच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी 67 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या बंधाऱ्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.
चार आमदार...एक बंधारा
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधाऱ्याला मंजुरी मिळाली. माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, तर आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. बांधकाम अर्धवट झाले अन् निधीमुळे रखडले. माजी आमदार अॅड. संजय धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीस मंजुरी मिळाली. अर्धवट बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामासाठी लघु सिंचाई विभागाने 67 लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते व शासनाकडे सादर करण्यात आले. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कामाचे भूमिपूजनही आटोपण्यात आले होते.