महाराष्ट्र

maharashtra

VIDEO: संचारबंदीचा फज्जा! नागरिकांचे विनाकारण बाहेर पडणे सुरूच

By

Published : Mar 31, 2020, 9:17 PM IST

संपूर्ण देश लॉकडाउन आहे, जमावबंदीचा कायदा लावण्यात आला असून नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना विनाकारण अनेक लोक शहरात मुक्तसंचार करताना दिसत आहेत. हा बेजबाबदारपणा नेमका कसा आहे हे दाखवणारा एक व्हिडिओच एका जागरूक नागरिकाने तयार केला आहे.

चंद्रपूर
चंद्रपूर

चंद्रपूर - कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला. यासाठी जमावबंदीचा कायदा लावण्यात आला असून नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना विनाकारण अनेक लोक शहरात मुक्तसंचार करताना दिसत आहेत.

प्राध्यापक डॉ. योगेश दूधपचारे यांनी जीपीएस तंत्रज्ञानाचा आधार घेऊन व्हिडिओ काढला असून यात त्यांच्या घरासमोरून वाहनाने विनाकारण बाहेर पडणारे लोक कैद झाले आहेत. 14 मिनिटांत तब्बल 40 लोक त्यांच्या घरासमोरून गेले. एका प्रभागातील केवळ एका जागेवरून गेलेली ही वाहने आहेत. शहरात अशी किती वाहने विनाकारण फिरत आहेत, याचा इशारा देणारा हा पुरावा आहे.

जिल्ह्यात जमावबंदी लागूनसुद्धा काही लोक निव्वळ मौज-मजा करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. यामुळे ते आपल्यासह आपले कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. पोलीस प्रशासनसुद्धा अशा लोकांवर कारवाई करीत आहे. मात्र, तरीही असा प्रकार सुरूच आहे.

प्राध्यापक डॉ. योगेश दूधपचारे तुकूम प्रभागात वास्तव्यास आहेत. त्यांनी जीपीएस तंत्रज्ञानाची मदत घेऊन काढलेल्या व्हिडिओत आपल्या प्रभागातील गंभीर परिस्थिती दाखवली आहे. घरासमोर काढलेल्या 14 मिनिटांच्या व्हिडिओत तब्बल 40 लोक त्यांच्या घरासमोर गेलेत. 14 मिनिटांत 40 लोक गेलेत. यात सिंगल सीट 35, डबल सीट 6 आणि पायदळ जाणाऱ्या लोकांचा सामावेश आहे.

विशेष म्हणजे, जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे काढण्यात आलेल्या या व्हिडिओतून त्यातील नेमके ठिकाण कळते. अशीच स्थिती शहरातील अनेक ठिकाणची आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणखी सक्ती करणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details