महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजुऱ्याला परतीच्या पावसाचा मोठ्या फटका; पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत - चंद्रपूर ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांतून पीक वाचवले. मात्र, शनिवारी झालेल्या पावसासमोर शेतकरी हतबल झाला आहे. आता याची दखल घेऊन सरकारनेच काहीतरी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धान पीक
धान पीक

By

Published : Oct 11, 2020, 4:14 PM IST

Updated : Oct 11, 2020, 4:20 PM IST

राजुरा (चंद्रपूर) - गोंडपिपरी तालुक्याला परतीचा पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

शनिवारी रात्री झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्याला झोडपून काढले. मेघगर्जनेसह बरसलेल्या वादळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले धान पीक जमिनीवर पसरले आहे. धाबा परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. बळीराजाने वन्यजीवांपासून मोठ्या प्रयत्नांतून वाचविलेली पिकांचे निसर्गाने मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील धान, कापूस, सोयाबीन आणि मिरची पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून त्वरीत भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Last Updated : Oct 11, 2020, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details