राजूरा(चंद्रपूर) - रविवारी झालेल्या वादळी पावसाचा फटका शेतपिकांना बसला. गोंडपिपरी तालूक्यातील अडेगाव येथे शेतातीत मक्क्याच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. दरम्यान गोंडपिपरी, कोरपना तालूक्यातील काही घरांची टिनपत्रे उडाली आहेत.
गोंडपिपरी तालूक्यात रविवारी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्रभर पाऊस कोसळल्याने काही परिसरात पाणी साचले होते. या पावसामुळे शेतीचे तसेच घरांचेही नुकसान झाले. गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या अडेगाव येथील मक्याच्या पिकांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला.
गोंडपिपरी तालूक्यात वादळी पावसात मक्याचे पीक भुईसपाट; बळीराजाचे मोठे नुकसान
गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या अडेगाव येथील मक्याच्या पिकांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला.
गोंडपिपरी तालूक्यात वादळी पावसात मक्याचे पिक भुईसपाट; बळीराजाचे मोठे नुकसान
संतोष विठोबा कुकडकार यांचा तीन एकर आणि शालिक नानाजी झाडे यांच्या चार एकर शेतात मक्याचे पीक उभे आहे. वादळी पावसात मक्याचे पीक भूईसपाट झाले आहे. त्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.