चंद्रपूर- मागील दोन दिवसात पुन्हा अवकाळी पावसाने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागाला झोडपून काढले. यात गोंडपिपरी तालुक्यातही वादळी पावसाने हाहाकार मांडला. वादळाने गोंडपिपरी-धाबा मार्गावरीव अनेक झाडे कोलमडून पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. धाबा गावातील वीज तार तुटल्याने गाव रात्रभर अंधारात होते. तर गारपिटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस.. पिकांचे मोठे नुकसान, धाबा रात्रभर अंधारात - चंद्रपूर बातमी
मागील दोन दिवसात पुन्हा अवकाळी पावसाने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागाला झोडपून काढले. जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात धाबा-गोंडपिपरी मार्गावरील अनेक झाडे कोलमडून पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात धाबा-गोंडपिपरी मार्गावरील अनेक झाडे कोलमडून पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मार्गावर पडलेल्या झाडांना हटविण्याचे कार्य सुरू आहे. वादळात धाबा गावातील विद्युत तारा तुटल्या. परिणामी धाबा, कोंढाणा, सोमणपल्ली गावांना अंधारात रात्र काढावी लागली. वादळी पावसासोबतच गारपिटीचा फटका तालुक्याला बसला. गारपिटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, तुटलेल्या विद्युत तारा जोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. आज दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होईल, अशी माहिती मिळत आहे.