चंद्रपूर - एका व्यक्तीला 26 वर्षीय मूकबधिर युवकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करणाऱ्या पोलिसांना विलगीकरणात (आयसोलेशन) ठेवले आहे. तर संपूर्ण पोलीस स्टेशन सॅनिटाइझ करण्यात आले. हा प्रकार बल्लारपूर शहरात घडला असल्याचे समोर आले आहे.
बल्लारपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबरला शहरातील टेकडी परिसरातील पंडित दीनदयाल वार्डातील गोशाळेत काम करणाऱ्या 26 वर्षीय मूकबधिर युवकावर आरोपीने जबरदस्ती करीत अनैसर्गिक कृत्य केले. सकाळी ही बाब पीडित युवकाने हातवारे करीत मालकाला सांगितली. मालकाने त्वरित याची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करून 2 सप्टेंबर रोजी त्याला अटक केली.
धक्कादायक; 26 वर्षीय मूकबधिर तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह - चंद्रपूर बल्लारपूर पोलीस न्यूज
26 वर्षीय मूकबधिर युवकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे अटक केलेला आरोपी कोरोनाबाधित आढळला. त्याला कोरोनाचा संसर्ग कसा नेमका झाला हे अद्याप कळले नाही. या आरोपीला उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. मात्र, हा एकूणच प्रकार अत्यंत गंभीर आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्हा कारागृहातील दोनशे कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्व आरोपींची अँटीजेन तपासणी केली जात आहे. 3 सप्टेंबरला या आरोपीची चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यामुळे पोलिसांना मोठा धक्का बसला. कारण जवळपास चार पोलीस या आरोपीला अटक करताना संपर्कात आले होते. सध्या सर्वांची अँटीजेन चाचणी करण्यात आली असून अद्याप कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. मात्र, या पोलिसांता आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, त्यांचा आरटीपीसीआर नमुना देखील घेण्यात येणार आहे.
या आरोपीला नेमका कोरोनाचा संसर्ग कसा झाला हे अद्याप कळले नाही. या आरोपीला उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. मात्र, हा एकूणच प्रकार अत्यंत गंभीर आहे. हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.