चंद्रपूर- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मागील २४ तासात १०४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ११२ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्ण संख्येच्या आलेखात पुन्हा चढ उतार दिसून येत आहे.
चंद्रपुरात कोरोना रुग्णसंख्येत होत आहे वाढ - कोरोना रुग्णसंख्येत वाढ चंद्रपूर बातमी
सध्या १३१३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २ लाख ५५ हजार ९९५ नमून्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २ लाख २४ हजार १४२ नमूने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ बाधितांचे मृत्यू झाले आहे.
ही आहे कोरोना बाधितांची आकडेवारी
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ९६८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार २४२ इतकी झाली आहे. सध्या १३१३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २ लाख ५५ हजार ९९५ नमून्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २ लाख २४ हजार १४२ नमूने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ बाधितांचे मृत्यू झाले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७४, तेलंगणा १, बुलडाणा १, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा १ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यात आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसूत्रीचा नियमित वापर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
हेही वाचा-आमिर खानला कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांच्या होता संपर्कात, आदित्य- रश्मी ठाकरे पॉझिटिव्ह