महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर : बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाने कारमध्येच घेतला अखेरचा श्वास

वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचे रुग्णांना अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे. आज अशीच एक घटना समोर आली. तब्येत बिघडल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाला घेऊन नातेवाईक अनेक दवाखाने फिरले. मात्र, बेड न मिळाल्याने 40 वर्षीय रुग्णाने आपल्याच कारमध्ये अखेरचा श्वास घेतला.

By

Published : Apr 19, 2021, 5:01 PM IST

Updated : Apr 20, 2021, 12:17 AM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. बेड न मिळाल्याने तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचे रुग्णांना अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे. आज अशीच एक घटना समोर आली. तब्येत बिघडल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाला घेऊन नातेवाईक अनेक दवाखाने फिरले. मात्र, बेड न मिळाल्याने 40 वर्षीय रुग्णाने आपल्याच कारमध्ये अखेरचा श्वास घेतला.

बेड न मिळाल्याने कारमध्येच रुग्णाचा मृत्यू -

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजारांच्यावर पोचली आहे, तर 600 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन कितीही म्हणत असले तरी सामान्य नागरिकांना बेड उपलब्ध होत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे बेडसाठी रुग्णांना वणवण फिरावे लागते आहे. तर काहींचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूदेखील होत आहे. रविवारी सकाळी ब्रम्हपुरी येथे बेड न मिळाल्याने एका रुग्णाने प्रवासी निवाऱ्यात अखेरचा श्वास घेतला. तर आज अशाच पद्धतीने एका रुग्णाला जीव गमवावा लागला. नगीनाबाग येथील 40 वर्षीय रुग्णाची स्थिती खालावली. यासाठी नातेवाईकांनी धावपळ सुरू केली. रुग्णाला कारमध्ये टाकून अनेक रुग्णालयात जाऊन विचारणा केली. मात्र, कुठेही बेड मिळाला नाही. अखेर शासकीय कोविड रुग्णालयाच्या परिसरात कारमध्येच या रुग्णाने प्राण गमावला.

हेही वाचा - देशातील कोरोना स्थितीच्या आढाव्यासाठी मोदींच्या नेतृत्वात बैठकीला सुरूवात

Last Updated : Apr 20, 2021, 12:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details