चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णालयातील कोरोना मॉकड्रिल चंद्रपूर :महाराष्ट्र राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत झाल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या संदर्भात राज्याची कोरोनाला हाताळण्याची एकूण काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आजपासून राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कोरोनाशी संदर्भात काय यंत्रणा आहे याची चाचपणी केली जाणार आहे.
सर्वांची स्थिती सामान्य: सध्या जिल्ह्यात 18 रुग्ण ऍक्टिव्ह असून एक रूग्ण विलगीकरण कक्षात आहे तर इतर सर्व आपल्या घरी विलगीकरण स्थितीत आहेत. रुग्णांचे आरोग्य सामान्य असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोले यांनी दिली. जिल्ह्यात सध्या कोविड वॉर्ड तयार झाला असून सर्व प्रकारची ऑक्सिजनची सुविधा आहे, तसेच आयसीयू देखील उपलब्ध आहे. सध्या मॉकड्रिल सुरू असून उद्या सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील एकूण आरोग्य यंत्रणेची परिस्थिती समोर येणार आहे.
दुसऱ्या लाटेत चंद्रपूर बेहाल: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये देशात लाखोंच्या संख्येने बळी गेले. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील हजारोंच्या संख्येने दररोज बळी जात होते. मात्र, चंद्रपूर जिल्हा यासाठी अपवाद ठरला होता. जेव्हा सगळीकडे कोरोनाची लाट होती, तेव्हा मात्र चंद्रपूरात एकही रुग्ण नव्हता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत देखील चंद्रपूर जिल्ह्याची एकूण रुग्णांची आकडेवारी ही अत्यंत कमी होती. दुसरी लाट अत्यंत घातक असल्याने लोकांना दवाखान्यात भरती करावे लागत होते. मात्र, भरती करण्याचे यंत्रणा ही अपुरी पडत होती आणि त्यामुळे उपचाराविना देखील अनेकांचे नाहक मृत्यू झाले होते. यानंतर तिसऱ्या लाटेमध्ये देखील चंद्रपूर जिल्ह्यात ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला होता. जिल्ह्यात लसीकरणाची तीव्रता देखील वाढविण्यात आली होती आणि अन्य आरोग्य यंत्रणा देखील उभारण्यात आल्या होत्या.
आरोग्य यंत्रणा सक्रिय: सुदैवाने तिसऱ्या लाटेत फारसे रुग्ण आढळले नाही आणि कोरोनाचा प्रसार झाला नाही. तरीही राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण राज्यभरात दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यात देखील या संदर्भात हालचालींना वेग आला असून, आज चंद्रपूर जिल्ह्यात मॉडेल तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा:Mock Drill At Nashik Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतला आढावाप्रकरणी राखी सावंत म्हैसूर कोर्टात पोहोचली.