चंद्रपूर : मठाची भिंत पाडल्यावरून झालेल्या वादात काँग्रेसचे नेतेराहुल पुगलिया यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला ( case registered against Rahul Puglia ) आहे. राहुल पुगलिया हे काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे पुत्र आहेत. मठाचे विश्वस्त किशोर कपूर यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( demolition of monastery wall case registered ) आहे.
राहुल पुगलिया यांनी भिंत तोडून मलाबा नेलादाखल झालेल्या तक्रारीनुसार शहरातील बालाजी वार्ड येथे श्री संत गुलाबदास महाराज यांचा मठ आहे. या मठाचे विश्वस्त म्हणून 66 वर्षीय किशोर कपूर व मुकुंद टंडन हे काम बघतात. 14 सप्टेंबरला हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया व राजेश काशीयावाले यांनी मठाची भिंत तोडून त्याचा मलबा नेला ( demolition of monastery wall in Chandrapur ) होता. त्यावेळी त्यांना भिंत का तोडली ? मलबा का नेला ? याबाबत हटकले असता त्यांनी कपूर यांना तुमच्याने जे होते ते करून घ्या, अशी धमकी दिली.