महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बल्लारपुरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घाला; राजू झोडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बल्लारपूर शहरात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीने पुन्हा आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे. यापूर्वी एका वडीलाने आपल्या दोन मुलांवर गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर एका कोळसा व्यापाऱ्यावर भर दिवसा गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला होता.

chandrapur Superintendent of Police
राजु झोडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

By

Published : Nov 24, 2020, 8:53 PM IST

चंद्रपूर - मागील काही दिवसांपासून बल्लारपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, दररोज गुन्हेगारीच्या घडामोडी घडत आहेत. बल्लारपूर शहरात गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांच्या घरी तलवारी, बंदुका, खंजर यासारखे शस्त्र असल्याची माहिती आहे. त्यामुळे भविष्यात बल्लारपूर येथील गुन्हे आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने ही गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

राजू झोडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बल्लारपूर शहरात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीने पुन्हा आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे. यापूर्वी एका वडीलाने आपल्या दोन मुलांवर गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर एका कोळसा व्यापाऱ्यावर भर दिवसा गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर एका युवकाचा शुल्लक कारणावरून खून करण्यात आला. या एकूणच घटना कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्श्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.

दरम्यान, बल्लारपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील रुजू झाल्यापासून त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा यशस्वी प्रयत्न चालवला असला तरी अपुऱ्या पोलीस संख्याबळामुळे त्यांना काम करण्यास अडचणी येत आहेत. बल्लारपूर शहरातील लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी बघता तिथे पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या घरी धाडसत्र मोहीम राबवून त्यांच्याकडील शस्त्रसाठा जप्त करणे आवश्यक आहे.

बल्लारपूर शहरात भविष्यात गुन्हेगारीतुन कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा बळी जाऊ नये यासाठी आपण या विषयावर गंभीरता पूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी याकरिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन दिले. निवेदनात वरील मागणी पूर्ण करून तात्काळ चंद्रपूर जिल्ह्यातील व बल्लारपूरातील गुन्हेगारी कमी करावी अशी मागणी केली. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, जिल्हा संयोजक प्रशांत उराडे, प्राध्यापक प्रमोद शंभरकर, गुरु कामटे, मल्लेश मुद्रिकवार उपस्थित होते.

हेही वाचा -विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग - शरद पवार

हेही वाचा -या ४३ अ‌ॅपवर केंद्राकडून बंदी, देशाच्या सुरक्षेला होता धोका

ABOUT THE AUTHOR

...view details